-->

Ads

Crime News: अल्पवयीन मुलांची 25 लाखांसाठी अपहरण करुन हत्या, मित्रांनीच केला घात

  


मीरा रोड येथे 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 14 वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काशिमिरा पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिरा रोड येथील शांतीपार्क परिसरात हिना नहार सिंग ही महिला अजय (15) आणि मयांक सिंग (14) या दोन मुलांसह राहते. ती बोरीवलीच्या एका बारमध्ये गायिका म्हणून काम करते. रविवारी रात्री ती नेहमप्रमाणे कामावर गेली होती. रात्री 12 च्या सुमारास तिचा मुलगा मयांक हा घरातून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवारी दुपारी मयांकचा मृतदेह वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला. चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी अफझल अन्सारी (22) आणि इम्रान शेख (24) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मयत मुलाचे मित्र आहेत.

मयांकची आई बारबाला असल्याने तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे आरोपींना वाटत होते. पैशांच्या आमिषाने त्यांनी मयांकचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता. दरम्यान, मयांकला संशय आल्याने आरोपींनी त्याची हत्या केली आणि नंतर त्याच्याच फोनने खंडणी मागितली, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी काशिमिरा पोलीस सखोल तपास करत असून त्यांनी नेमकी हत्या का केली? खंडणीसाठी केली की अन्य काही कारण होत? याचा तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments