वसईच्या समुद्र किनाऱ्यावरून खोल समुद्रात आगसदृश्य प्रकार पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. अरबी समुद्रात अचानक दिसले आगीचे लोळ दिसू लागले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून समुद्रात आगसदृश्य चित्र दिसत होते. वसई-विरारच्या सर्वच समुद्र किनाऱ्यावरून खोल समुद्रात आग लागल्याचं दिसून येत होतं. खोल समुद्रात अचानक हे आगीचे लोळ दिसल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं.
रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास या भयानक आगीची दृश्य समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हा प्रकार अर्नाळा पोलिसांना सांगितला. मात्र या प्रकारावर सुरुवातीला प्रशासकीय यंत्रणादेखील अनभिज्ञ होत्या.ही आग नेमकी कशाला लागली आहे? खोल समुद्रात काय पेटत आहे याबाबत काहाही माहिती नसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यानंतर या संदर्भात विरार अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की 15 नोटिकल खोल समुद्रात ongc ऑइल रीघचे काम सुरू आहे. त्यामुळे आगीचे लोळ दिसून येत आहेत. यात घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
0 Comments