-->

Ads

'दिवसेंदिवस हिचा वेडेपणा वाढतंच चाललाय'; उर्फी जावेदच्या बोल्ड लुकवर नेटकरी संतापले

  


अभिनेत्री उर्फी जावेद (Urfii Javed) स्टाइल, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिच्या अफलातून फॅशनमुळे ती नेहमीच नेटकऱ्यांना थक्क करत असते. उर्फीला तर आता फॅशन आयकॉन म्हणायला सुरुवात केली आहे. प्रत्येक वेळी नवीन आणि बोल्ड लुक घेऊन उर्फी समोर येत असते. अशातच यावेळीही उर्फीनं नवा आणि हटके, बोल्ड लुक केला आहे. तिच्या लुकमुळे सध्या ती नेहमीप्रमाणेच ट्रोल होत आहे.

उर्फीचे नवीन रूप लोकांना आश्चर्यचकित करत असतं. अभिनेत्रीचा असाच एक लेटेस्ट लूक समोर आला आहे. यावेळी उर्फी फक्त टॉपलेसच नाही तर ब्रालेटही झाली आहे. उर्फीनं हे ब्रालेट फोटोशूटही खूप आत्मविश्वासानं केल्याचं पहायला मिळतंय. उर्फीला या नव्या लुकवरुन मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. अनेक प्रतिक्रिया उर्फीच्या या बोल्ड व्हिडीओवर येत आहेत.

उर्फीच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 'एक ना एक दिवस उर्फीला न्यूड तर यायचंच होतं, काय काय फॅशन झालीये, रणवीर सारखंच उर्फीला पण कपडे देण्याची गरज आहे, दिवसेंदिवस हिचं वेडेपण वाढतच चाललं आहे', अशा अनेक कमेंट येत असून उर्फी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
https://www.instagram.com/reel/CgtLBz0FNOj/?igshid=YmMyMTA2M2Y=

दरम्यान, उर्फीचा हा व्हिडिओ काही मिनिटांतच वेगाने व्हायरल झाला आहे. उर्फीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक असून सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.

Post a Comment

0 Comments