उत्तर प्रदेशातल्या शाहजहानपूर जिल्ह्यात 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. 27 वर्षानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्षाने आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत एसपी संजय कुमार यांनी सांगितलं की, ``सदर बझार पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणारी पीडित तरुणी घटना घडली त्यावेळी 12 वर्षांची होती. परिसरातील आरोपी हसन आणि त्याचा लहान भाऊ गुड्डू यांनी या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. या दोन्ही आरोपींनी तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. या घटनेनंतर वयाच्या 13 वर्षी पीडित तरुणी गर्भवती राहिली आणि तिनं 1994 मध्ये एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिनं शाहजहानपूर जिल्ह्यातल्या एका गावातल्या एका व्यक्तीकडे मुलाला सोपवलं आणि पीडित तरुणी तिच्या मेव्हण्यासोबत रामपूरला निघून गेली.``
``सुमारे 27 वर्षानंतर पीडितेच्या मुलानं आपल्या आई-वडिलांविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचं संगोपन करणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या आईचं नाव त्याला सांगितलं. त्यानंतर मुलानं त्याच्या आईची भेट घेतली. महिलेनं मुलाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित महिलेनं फिर्याद दिली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात (Police Station) दोन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी, पीडित महिला आणि मुलाची डीएनए टेस्ट करण्यात आली,`` असं एसपी संजय कुमार यांनी सांगितलं.
दरम्यानच्या काळात, मुलाला एका व्यक्तीकडे सोपवल्यानंतर पीडित महिलेच्या मेव्हण्याने तिचा विवाह गाझीपूर येथील एका व्यक्तीशी करून दिला. पण सुमारे 10 वर्षानंतर या महिलेच्या पतीला बलात्काराच्या घटनेबाबत समजलं. त्यानंतर त्याने पीडित महिलेला घटस्फोट (Divorce) दिला. घटस्फोटानंतर ही पीडित महिला तिच्या उधमपूर या गावात राहू लागली,`` असं एसपी संजय कुमार यांनी सांगितलं.
एसपी संजय कुमार म्हणाले, ``आरोपी, महिला आणि तिच्या मुलाची डीएनए चाचणी करण्यात आली.
0 Comments