-->

Ads

VIDEO : मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा, एकमेकांचे केस ओढत जबर हाणामारी


 मध्यप्रदेश राज्याची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) भररस्त्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला आहे. ही घटना एका मॉलच्या (Hoshangabad Road) बाहेर घडली. येथे काही मुली आपापसांतच भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी एकमेकांना लाथांनी हाणामारी (Drunk Girl Fighting on Road) केली. त्या आपापल्या बॉयफ्रेंड्ससोबत होत्या. तिथे त्यांच्यात वाद झाला.

भोपाळमधील एका बारमध्ये आधी मुलींनी त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत दारू प्यायली. त्यानंतर त्या सर्व बाहेर आले असता त्यांनी एकमेकांशी काही गोष्टीवरून हाणामारी केली. एकमेकांचे केस पकडून त्यांनी हाणामारी केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मुला-मुलींना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तसेच त्यांचे मेडिकल चेकअप करुन घेतल्यानंतर आपापसात समझौता केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

ही घटना होशंगाबाद रोडवर असलेल्या एका मॉलमध्ये घडली. लाथा-बुक्के मारतानाचा मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा न्यूज 18 नाही करत. व्हिडीओमध्ये चार-पाच मुलींचा जत्था दिसत आहे. यातील एकजण दुसऱ्या मुलीला मारहाण करताना दिसत आहे. काही काळ एक मुलगी दुसर्‍या मुलीला मारते, मग त्यांच्यात लाथा-बुक्के चाललात. इतकेच नाही तर दोन्ही मुलींनी एकमेकांचे केसही पकडले होते. दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली. दरम्यान, शेजारीच उभे असलेले त्यांचे प्रियकर आले आणि त्यांनी मध्यस्थी केली.

घटनेआधी मुलींनी आपल्या प्रियकरासोबत बारमध्ये दारू प्यायल्याचे सांगितले जात आहे. सर्वजण नशेत होते. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाची माहिती मिसरोड पोलीस ठाण्याला मिळताच एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यानंतर सर्व मुली आणि त्यांच्या बॉयफ्रेंड्सला पोलीस ठाण्यात घेऊन आले. इथे आल्यानंतर सर्व जण माफी मागायला लागले. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणी केली. तसेच दोन्ही मुलींनी आपापसात समझौता केला. यानंतर लेखी कारवाईनंतर सर्वांनी पोलिसांनी सोडून दिले. हे सर्वजण भोपाळच्या गांधीनगर, जमालपुरा आणि शाहपुरा येथील रहिवासी आहेत.

Post a Comment

0 Comments