अमरावती, 19 जुलै : मागच्या एक आठवड्यापासून अमरावतीमध्ये पावसाने हाहाकार माजला आहे. (vidarbha rain update) अमरावतीसह विदर्भातील पावसाने कित्येक नद्यांना महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. अमरावतीत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. विदर्भात झालेल्या पावसाने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. नेतेमंडळी फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आणि नागरिक समस्यांनी त्रस्त अशी जनभावना उमटू लागली आहे,
दरम्यान चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव येथील 1 घर जमीनदोस्त झाले. या घरात 5 व्यक्ती राहत होत्या. दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसाने अचानक घर कोसळून यातील 5 व्यक्तींच्या अंगावर घर कोसळल्याने 2 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 3 जणांना बाहेर काढण्यात यश आल आहे. यात आई आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. 3 व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे हलवण्यात आलेला आहे. पायल अरुण वराडे (वय 7), चंदा अरुण वराडे (वय 35) अशी मृतांची नावे आहेत.
राज्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. (Maharashtra rain update) विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे महापुराची परिस्थीती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने 108 गावांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार कोकणा आणि विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबाबत imd कडून orange alert देण्यात आला आहे. मुंबई पुण्यात पावसाचा जोर ओसरला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने कोकण व विदर्भात आगामी चार दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील उर्वरित भागात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले. विदर्भातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्या भागातही 19 ते 22 जुलैपर्यंत पाऊस राहणार आहे. पावसाचा जोर कमी असला तरी संततधार पाऊस असण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
0 Comments