-->

Ads

Live मॅचदरम्यान मोठा अपघात; प्रतिस्पर्ध्याच्या पंचमुळे रिंगमध्ये कोसळला 23 वर्षीय बॉक्सर, मृत्यू


  बंगळुरुतील (Bangalore News) किक-बॉक्सिंग मॅचदरम्यान (boxing champion) एक मोठा अपघात घडला आहे. एका किक बॉक्सरचा बॉक्सिंग रिंगमध्ये गंभीर मार लागल्याने बंगळुरुतील एका रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी या घटनेबाबत माहिती मिळाली. बॉक्सरचं नाव निखिल सुरेश (Nikhil Suresh) असून तो अवघ्या 23 वर्षांचा होता. मृत बॉक्सरच्या आई-वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी बंगळुरू ज्हाना ज्योती नगर भागातील इंटरनॅशनल बिल्डिंगमध्ये के-1 राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशीलदरम्यान घडली. निखिलने (boxer dies after falling into ring due to opponents punch) बॉक्सिग स्पर्धेत भाग घेतला होता. बॉक्सिंग रिंगमध्ये निखिल आपल्या विरोधकांला चांगल्या प्रकारे सामना करीत होता. यावेळी प्रेक्षकही त्याला प्रोत्साहन देत होते. यादरम्यान बॉक्सिंग रिंगमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून एक मुक्का लागल्यानंतर तो खाली कोसळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. यानंतरत्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याच दिवशी म्हैसूरमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. निखिलच्या आई-वडिलांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात बंगळुरूच्या ज्ञानभारती पोलीस स्टेशनमध्ये निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पर्धा सुरू असताना तेथे डॉक्टर वा रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजक नवीन रविशंकर फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments