-->

Ads

बीडमध्ये मध्यरात्री पेट्रोल पंपावरील सुरक्षारक्षकाला मारहाण करत जबरी लूट; घटना CCTV मध्ये कैद

 बीड 25 जुलै : बीडच्या येळंबघाट येथे मध्यरात्री पेट्रोलपंपावरील सुरक्षारक्षकाला मारहाण करून जबरी लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने सुरक्षारक्षकाला जवळ बोलावून घेत मारहाण केली आणि यानंतर लूट केली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. येळंबघाट येथील अरविंद जाधव यांच्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फु टेजच्या आधारे पेट्रोलपंपात मारहाण करून जबरी लूट करणाऱ्या दोघांना दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक केली. दोघंही एका हॉटेलात पार्टी करताना नेकनूर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या . अजय ढोले ( वय 25 , रा . बार्शी नाका , बीड ) आणि शुभम कवडे ( 26 , रा . रामनगर , ता.बीड ) अशी आरोपींची नावं आहेत .

पेट्रोल पंपावरील वॉचमन भिकाजी इंगोले हे रखवाली करत होते . यावेळी अनोळखी दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी पेट्रोल मागितले असता इंगोले यांनी कर्मचारी झोपले आहेत, असे सांगितले. त्यावर दोघांनी त्यांना मोबाइल मागितला. इंगोले यांनी मोबाईल देण्यास नकार दिला तेव्हा पंपावरील कर्मचारी आणि पैसे कुठे आहेत, याबाबत विचारणा करण्यास सुरुवातकेली.

यादरम्यान आरोपींनी इंगोले यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी त्यांच्या खिशातील 3 हजार रुपये बळजबरीने हिसकावले. गोंधळ झाल्याने इतर कर्मचारीही उठले, यानंतर भीतीने चोरटे पळून गेले. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.



Post a Comment

0 Comments