-->

Ads

प्रेम करणं तरुणाला पडलं महागात; सख्ख्या भावानेच घेतला जीव, नागपुरातील दुहेरी हत्याकांडात मोठा खुलासा

 स्वत:ची पत्नी सोडून आधीच लग्न झालेल्या दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या भावामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानेच तरुणाची हत्या केली, असल्याचं समोर आलं आहे



    नागपूर 09 जुलै :
     नागपूर पोलिसांनी एका दुहेरी हत्याकांडाचा (Nagpur Double Murder) उलगडा केला आहे. या घटनेत नदीपात्रात दोघांचे मृतदेह आढळले होते. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. यावेळी हत्येतील आरोपी आणि कारणाचा खुलासा झाला. महत्त्वाचं म्हणजे समाजात प्रतिष्ठा कमी झाल्याने भावानेच भावाची हत्या केल्याचं या घटनेत पुढे आलं आहे.

    स्वत:ची पत्नी सोडून आधीच लग्न झालेल्या दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या भावामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानेच तरुणाची हत्या केली, असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



    शेतीच्या कारणावरून अगोदरच या दोघा भावांमध्ये वाद सुरू होता. त्यातच बदनामीमुळे आगीत तेल ओतलं गेलं. उत्तम बोडखे आणि सविता परमार या दोघांची हत्या आरोपी राहुल बोडखे , खुशाल बोडखे , विजय बोडखे आणि आकाश राऊत यांनी केली आहे. मृतक आणि आरोपी हे मूळचे वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील आहेत.

    Post a Comment

    0 Comments