-->

Ads

साथीच्या आजारापासून सावध रहा : डॉ. शेख सदफ राणा सत्तार याचं नागरिकांना आव्हान



महागाव प्रतिनिधी:-  संजय जाधव


    पावसाळ्याला सुरुवात झाली असून पावसाळ्यात व्हायरल आजारांचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात सर्वात मोठा धोका डेंग्यू आणि मलेरियाचा सारख्या व अतिसार आजारांचा असून ज्याचा परिणाम ग्रामीण भागात दिसू लागला आहे. विशेषता डेंगू जो एडीज एजिप्टी नावाच्या डासांद्वारे पसरतो. हे डास घरगुती वातावरणात आणि आजूबाजूला साठवून ठेवलेल्या शुद्ध पाण्यात वाढतात.


गत काही दिवसापासून अधून मधून पाऊस कोसळत आहे पाऊस धो धो न झाल्याने अजून उकाडा कायम आहे त्यामुळे नागरिकांनी अजून कुलर काढले नसून त्या कुलरच्या टब मध्ये पाणी साचलेला असतो व त्यामुळे


डासांची उत्पत्ती होते म्हणून कुलरचे टब काढून ठेवावे आजूबाजूला पाणी साचणार नाही याची खात्री करुन घ्या. फुलसांवगी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील परिसरातील राहुर , दगडथर, आमनी, वडद,टेभीं,बिजोरा येथील उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसांवगी  येथे 24 तास सुविधा उपलब्ध असून आमचे आशा वर्कर जनजागृती करण्यासाठी दारोदारी पोहोचत आहे नागरिकांना काही त्रास झाल्यास ताबडतोब आपल्या गावातील अशा सेविका यांना कळवावे असे आव्हान डॉक्टर शेख सदफ राणा सत्तार वैद्यकीय अधिकारी  फुलसावंगी यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे.


Post a Comment

0 Comments