नुपूर शर्मा सोबतच कन्हैयालाल यांच्या मारेकऱ्यांना ही कठोर शिक्षा व्हावी
अंबरनाथमधील सोशल अँड लॉयल ग्रुपची पोलीस प्रशासनाकडे मागणी
इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या बद्दल भाजपच्या नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केवळ भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात याचे पडसाद उमटू लागले. भाजपने प्रसंगावधान राखत शर्मा यांना भाजपच्या प्रवक्ता पदावरून निलंबित केले आणि त्यांची सदस्यता ही रद्द केली.
यानंतर काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या उदयपूर शहरात नुपूर शर्माचे समर्थन केल्याच्या संशयातून दोन मुस्लिम युवकांनी कन्हैयालाल या व्यक्तीची अमानुष हत्या केली, याचे पडसाद आपल्या शहरात उमटू नये यासाठी अंबरनाथमधील सोशल अँड लॉयल क्लब तर्फे आज अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देऊन नुपूर शर्मा सोबतच त्या दोन्ही युवकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
3D न्यूज,
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments