-->

Ads

मायलेकीची ताटातूट! मुलीला बनवायचं होतं पोलीस अधिकारी, पण पतीच्या 'या' गोष्टीमुळे घेतला गळफास




एका व्यक्तीच्या दारुच्या व्यसनामुळे एका मायलेकीचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. यात आईने आपला जीव गमावला असून लेकीच्या डोक्यावरील मायेचं छत्र हिरावून घेतलं आहे. कारण, मद्यपी पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी उत्तर प्रदेशातील उन्नावमधून समोर आली आहे. महिलेने सुसाईड नोट मागे ठेवली असून, त्यात मुलीला पोलीस अधिकारी बनवायचं स्वप्न होतं, असं लिहिलं आहे. पण ते स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याचं तिला दु:ख असल्याचंही तिनं लिहलंय. तिच्या मृत्यूसाठी तिने पतीला जबाबदार धरले आहे. यासोबतच मुलीला पतीपासून दूर ठेवण्याचा उल्लेख केला आहे. याशिवाय पतीला कठोर शिक्षा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

मद्यपी पती पत्नी आणि निष्पाप मुलीला रोज मारहाण करून त्रास देत असे. मुलीला पोलिसात भरती करण्याचे आईचे स्वप्न होते, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. आईला फासावर लटकलेले पाहून निष्पाप मुलीचे भान हरपले आहे. पोलिसांनी मृतदेह पीएमसाठी पाठवला असून पतीविरुद्ध एफआयआर दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्नाव सदर कोतवाली परिसरातील मोहल्ला पुरानी बाजार येथे राहणारा मोहित गुप्ता याचे आराधना गुप्तासोबत 2015 मध्ये लग्न झाले होते. दारूच्या नशेत पती पत्नी आणि मुलीला रोज मारहाण करायचा. रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नीने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी पतीला जबाबदार धरण्यात आले आहे. आपल्या मुलीला पोलीस करण्याचं मृत महिलेचं स्वप्न होतं. मृताची निष्पाप मुलगी इक्षा हिने जे सांगितले ते ऐकून प्रत्येकजण अस्वस्थ होत आहे. वडिलांनी आईची हत्या केली, नंतर तिला फासावर लटकवले, असे इशाने सांगितले आहे. मुलीच्या साक्षीचाही तपास पोलीस करत आहेत.

मृत महिलेने पाच वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. तिला पोलीस अधिकारी बनवायचं होते, त्यासाठी ती स्वत: तिला शिक्षण देत होती. मात्र, पतीच्या छळामुळे तिने गळफास लावून घेतला. सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले की, आमचं आमच्या मुलीवर खूप प्रेम आहे. पण, आम्ही आमच्या मुलीसोबत राहू शकलो नाही, आमचे स्वप्न आमच्या मुलीला पोलिस बनवण्याचे होते. आपल्या आईचं स्वप्न नक्की पूर्ण कर. मला माफ कर मी फक्त तुझ्यासाठी जगत होते, असे लिहून तिने मृत्यूला कवटाळले.

Post a Comment

0 Comments