पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधांमुळे उफाळलेल्या वादात मोठा गदारोळ झाला.
संबंधित घटना ही पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात घडली. या घटनेत जयश्री विठ्ठल रणदिवे या पन्नास वर्षीय महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी मुख्य हल्ला करणारा रामदास सर्जेराव कांबळे याच्यासह सीताराम सर्जेराव कांबळे, हरिदास सर्जेराव कांबळे आणि इंदापूर येथील संतोष उकरंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या हल्ल्यात आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या जयश्री रणदिवे यांच्या हातावर जोरदार वार लागला. त्यामुळे त्यांच्या हाताचा पंजाच तुटून पडल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. महिलेवर वार केल्यामुळे आरोपीस देखील जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आले.
र्डी येथील संतोष रणदिवे याच्या अनैतिकसंबंधावरून गुरूवारी सकाळी रणदिवे आणि कांबळे कुटुंबात वाद निर्माण झाला. यावेळी रामदास कांबळे याने आपल्या बरोबर कुर्हाड तर संतोष उकरंडे याने तलवार आणली होती. भांडणामध्ये रामदास याने तलवारीने संतोष रणदिवे याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी जवळच उभी असलेली संतोषची आई जयश्री रणदिवे यांनी मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याच्या पुढे आपला हात घातला.
रामदास कांबळे याने जोरदार वार केल्याने जयश्री यांच्या हाताचा पंजाच हतावेगळा झाला. यावेळी घटनास्थळी अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. रणदिवे यांच्या कुटुंबियांनी तातडीने जखमी जयश्रींना पंढरपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. तर आरोपी रामदास कांबळे याला देखील उपस्थितांनी चांगलाच चोप दिल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
0 Comments