-->

Ads

वनसंवर्धन दिन महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला आनंदात साजरा..

 विद्यार्थ्यांनी गिरवला पर्यावरणाचा धडा...

 महात्मा गांधी हायस्कूल, बहरामबाग, जोगेश्वरी येथील विद्यार्थ्यांनी वनसंवर्धन दिन केला आनंदात साजरा. वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाप्रती सजक राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. संबंधित प्रभात फेरी पर्यावरण पूरक घोषणा देण्यात आल्या. पाचवी ते नववि इयत्तेतील विद्यार्थ्यांचे अनेकविध कार्यक्रम संबंधित कार्यक्रमात घेण्यात आले. यामध्ये भाषण, पर्यावरण पूरक गाण्यावर नृत्य सादरीकरण, गीत गायन, नाटिका इत्यादी कार्यक्रम समाविष्ट होते.


 संबंधित कार्यक्रमात जयेश वोरसोरा हे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. त्यांनी दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांनी कोणत्या चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत यावर विस्तृत माहिती दिली. त्याचबरोबर पर्यावरणाप्रती सजग राहून आपण कमी वेळात कोणती कामे करू शकतो यावर विस्तृत चर्चा केली. शाळेच्या मुख्याध्यापिका शशी यादव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा नेहमी आदर करून आपली कृती करावी असा उपदेश दिला. संस्थेचे व्यवस्थापक भावेश यादव सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढे सुद्धा पर्यावरणाप्रती कार्यरत राहण्याचा सल्ला दिला.सुधाकर सर यांनी सुद्धा छोटीशी कथा सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. ओपी यादव सर यांनी मृदेचे महत्त्व पटवून दिले. प्रांजल सिंगासने मिस यांनी प्लास्टिक ब्रिक व सीड बॉल म्हणजे काय याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. सुमन मिस, डिंपल मिस, रेणुका मेस, अरुण सर, संतोष सर, प्रल्हाद सर, या व इतर सर्व शिक्षकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.


दरम्यान, संबंधित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणात प्रति प्रेम व आस्था वाढवण्यात मदत मिळाली. विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने वृक्ष लावण्या संकल्पनेचा मनःपूर्वक स्वीकार केला. पर्यावरण पूरक कार्यक्रम संस्थेच्या व्यवस्थापकांकडून वारंवार घेण्यात येतात परिणामी विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती आस्था निर्माण होण्यास मदत होते.

Post a Comment

0 Comments