नागपुरातून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. परराज्यातील मुलींना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करविणाऱ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.
पोलीस पथकाने सापळा रचला आणि गड्डीगोदाम येथील ‘ओयो टाऊन हाऊस हॉटेल’ येथे कारवाई कर एका पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी आपल्या कारवाईत सूत्रधार रोशन ऊर्फ सलमान राजेश डोंगरे (33, अंबाझरी हिल टॉप, पांढराबोडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ‘ओयो टाऊन हाऊस हॉटेल’ येथे देहव्यापार चालवला जातो, अशी टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि बनावट ग्राहक पाठविला. ग्राहकाने रोशनशी मुलीचा सौदा केला. यानंतर त्याने इशारा दिल्यावर पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपी रोशन ऊर्फ सलमान राजेश डोंगरे याला अटक केली आहे. आरोपी रोशन हा परराज्यातील गरीब मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा. तसेच यानंतर त्यांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचा. याप्रकरणी त्याच्याविरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
0 Comments