एका नर्सरीत हे दोघं भेटले होते. या वेळी रात्री 2.30 च्या सुमारास या दोघांमध्ये भरपूर वाद झाला. त्या वादामधूनच पुढे हा सर्व प्रकार (Murder) घडला.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, हरिओम चौरे हा एक चौकीदार होता. त्याचे नागपुरात राहणारा किन्नर निक्कीशी (Kinner Nikki Murder) शारीरिक संबंध होते. 15 जुलैच्या रात्री मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये सारनी (MP Sarani murder case) पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका नर्सरीत हे दोघं भेटले होते. या वेळी रात्री 2.30 च्या सुमारास या दोघांमध्ये भरपूर वाद झाला. हरिओमचे निक्की व्यतिरिक्त अन्य व्यक्तींशीही संबंध आहेत या कारणातून त्यांच्यात वाद सुरू झाला होता. यावेळी अचानक निक्कीनं स्वत:च्या हातावर जखम करून घेतली, आणि पोलिसांना फोन करुन हरिओमने आपल्याला मारल्याचे तिने सांगितलं.
पोलिसांना फोन केल्यानंतर निक्कीनं नेमका पत्ता सांगितला नाही. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. त्यानंतर निक्कीने आपला मोबाईलदेखील बंद करून ठेवला. सकाळच्या वेळी जेव्हा पोलीस नर्सरीजवळ पोहोचले, तेव्हा त्यांना हरिओमचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. हरिओमच्या मृत्यूबाबत पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी, 18 जुलैला नर्सरीच्या मागच्या भागात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना मिळाला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटण्यास वेळ लागला. मात्र, नंतर हा निक्कीचाच मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर मग पोलीस तपासात सगळा प्रकार समोर आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम चौरे हा छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी होता. तो सारनीमध्ये एका नर्सरीत चौकीदार म्हणून काम करायचा. हरिओमच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं की त्याचे आणि किन्नर निक्कीचे संबंध होते. यानंतर तपासात असं समोर आलं, की हरिओमने आधी बदनामीच्या भीतीने आपल्या किन्नर मित्राची गळा आवळून हत्या केली; आणि नंतर त्याच दोरीने गळफास घेत आत्महत्या (Suicide after Killing) केली. सारनीचे टीआय रत्नाकर हिंगवे यांनी याबाबत माहिती दिली.
0 Comments