-->

Ads

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मुठीत जिव धरून कराव लागतो प्रवास


फुलसावंगी/प्रतिनिधी 

   गेल्या दहा ते बारा दिवसापासून सततधार पावसाची रिपरीप सुरू आहे.त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.त्यात भरीसभर म्हणजे फुलसावंगी ते ढाणकी रस्त्याचे सुरू असलेले काम.याच रस्त्यावर फुलसावंगी पासून काही अंतरावर नविन पुल निर्मितीचे कार्य सुरू आहे.परंतु गेल्या चार दिवसापुर्वी येथील पर्यायी पुल नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला.तो परत बनविण्यात आला.परंतु दि.१२ जुलै रोजी राञीला झालेल्या पावसात परत हा पुल वाहून गेला.त्यामुळे या नाल्याच्या पलीकडे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्यांना बैलांना चारा पाणी करण्यासाठी जाव लागते.परंतु नाल्यावरील पुल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना जिव मुठीत धरून पुल ओलांडून जाव लागत आहे.त्यामुळे संबंधित ठेकेदाराने जर वेळे आधीच पुल निर्माण केला असता तर ही वेळ शेतकऱ्यांवर आलीच नसती.

🔹 या परिस्थितीस ठेकेदारच जबाबदार 

     संबंधित ठेकेदारास या पुर्वी अनेक वेळा आम्ही सांगितले होते कि पुल निर्मिती चे काम वेगात करा.अन्यथा पावसाळ्यात पर्यायी पुलामुळे शेतकऱ्यांना ञास सहन करावा लागेल.परंतु संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे आज रोजी शेतकऱ्यांना शेतात असलेल्या गायी,बैलासाठी चारा-पाणी करण्यासाठी जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

जर एखादा अनुचित प्रकार घडल्यास यास ठेकेदार जबाबदार असेल.....

    प्रमोद महाजन....शेतकरी

Post a Comment

0 Comments