दि.12 जुलै.
मागील आठवडाभरापासून यवतमाळ जिल्ह्यातील परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे,गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे,अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी केली आहे.
चालू खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे,पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाच उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते,काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती,मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती,परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पिके पिवळी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,लहान ओढे,नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, या संकटातून सावरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यकता सर्व उपाययोजना करून पुरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी व तसेच यासंदर्भात राज्यसरकारकडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डि.टि.आबेंगावे व जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून अतिवृष्टीनेग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही अनिल राठोड यांनी सांगितले आहे.
0 Comments