-->

Ads

मैत्रिणीवरच जडला जीव, तिने बोलणे बंद केले अन् मित्राने उचलले हे विचित्र पाऊल


  उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात एकतर्फी प्रेमाचे (One Side Love) खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. ही घटना सराय मंदराज गावात घडली. इथे एका युवतीने बोलण्यास नकार दिल्यामुळे युवकाने तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केले.

एकतर्फी प्रेमात पागल झालेल्या युवकाने युवतीच्या घरीच धडक दिली. तसेच तिच्यावर चाकूने हल्ला केला. (Attack on Young Girl) याचदरम्यान, घरातील लोकांनी आरोपी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो छतावरून पळू लागला आणि विजेच्या तारांना धडकला आणि जमिनीवर पडला. यानतंर जखमी युवती आणि युवक दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी, युवतीच्या परिवाराने दिलेल्या तक्रारीनंतर कलम 307 आणि 357 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदराज गावात राहणाऱ्या या 20 वर्षीय मुलाची त्याच गावातील एका मुलीशी मैत्री होती. दरम्यान, दोघांमध्ये काही गोष्टीवरून भांडण झाले, त्यानंतर मुलीने मुलाशी बोलणे बंद केले. याचा राग आल्याने तरुणाने हे धक्कादायक पाऊल उचलले.

आजमगढचे शहर पोलीस अधीक्षक शैलेंद्र लाल यांनी सांगितले की, ही घटना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. युवक आणि युवती दोघांमध्ये आधीच ओळख आहे. या युवतीने या युवकासोबत बोलणे बंद करुन टाकले होते. यानंतर तो निराश झाला आणि त्याने संतापाच्या भरात युवतीवर चाकूने हल्ला केला. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहितीही शैलेंद्र लाल यांनी दिली.



Post a Comment

0 Comments