जेव्हा याचा अतिरेक झाला तेव्हा तिने शाळेच्याप्रशासकांकडे आपली व्यथा सांगितली. ज्यानंतर शाळेतील प्रशासनाने याबाबतची माहिती कुटुंबीय आणि पोलिसांना दिली. त्याच्या आधारावर पोलीस या प्रकरणात तपास सुरू करीत आहे.
13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापाने बलात्कार केल्याचा खुलासा शाळेतील तक्रार पेटीवरुन झाला. शाळेत विद्यार्थ्यांची समस्या आणि तक्रारीसाठी गुप्तपणे एक पेटी ठेवण्यात आली आहे. मुलीने बापाबद्दलचा खुलासा या पेटीतून केला. तिने लिहिलं आहे की, गेल्या दोन वर्षांपासून बाप त्याच्यासोबत घाणेरणं कृत्य करीत होता. 25 जुलै रोजीही तिच्यासोबत जबरदस्ती करण्यात आली होती. विरोध केल्यामुळे तो तिला मारहाण करीत होता. जेव्हा शाळेतील व्यवस्थापकांनी ते पत्र वाचलं तर त्यांना धक्काच बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार पेटीतील पत्र वाचल्यानंतर प्रशासनाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. ज्यानंतर अल्पवयीन मुलीच्या काकीला शाळेत बोलावलं. त्यांनी पत्र दाखवून वडिलांनाच्या कृत्याबद्दल सांगितलं. यानंतर कुटुंबीय अल्पवयीन पोलीस ठाण्यात गेले. येथे आरोपी वडिलांच्या विरोधात तक्रार केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा मृत्यू 12 वर्षांपूर्वी झाला होता. आजारातून त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून मुलगी बाबासोबत राहत होती. गेल्या दोन वर्षांपासून ती वडिलांसोबत राहत होती. वडिलांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
0 Comments