अग्निपथ सैन्य भर्ती योजनेच्या विरोधातील (Agnipath Scheme Protest) आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. बिहारमध्ये या योजनेला तीव्र विरोध होत आहे.
बिहारमध्ये शुक्रवारी सकाळपासून अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी आंदोनल सुरू झालं. लखीसराय स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तरूण जमा झाले होते. त्यांनी या स्टेशनची तोडफोड केली. हिंसक आंदोलकांनी दिल्ली-भागलपूर दरम्यानच्या विक्रमशीला सुपरफास्ट ट्रेनला आग लावली. या आगीत अनेक बोगी जळाल्या. त्याचबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मची तोडफोड केली. या आंदोलनात भारतीय रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धरमपूरजवळ संपर्क क्रांती सुपर फास्ट ट्रेनमध्येही आग लावण्यात आली. ही रेल्वे अडवून अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांकडून लूट
लखीसराय रेल्वे स्टेशनवरील फूड स्टॉल आणि दुकानांमधील सामानांची लूट आंदोलकांनी केली आहे. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये हे आंदोलक फूड स्टॉलच्या सामनांची लूट करत असल्याचं स्पष्ट दिसत आहेत. तसंच हा प्रकार सुरू होता, त्यावेळी तिथं एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता.
0 Comments