चोरट्यांची नजर 4,200 डॉलरच्या (3 लाख रुपयांच्या) दारूच्या बाटलीवर गेली. त्यांनी याबाबत चौकशी केली असता दुकानातील एका कर्मचाऱ्याने येऊन डिस्प्ले कॅबिनेटचं कुलूप उघडलं
नवी दिल्ली 14 जून : अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये दारूच्या दुकानावर दरोडा टाकताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या तीन चोरांचा पोलीस शोध घेत आहेत. यात महाग समजून चोरांनी दारूची बाटली चोरून नेली, पण प्रत्यक्षात ती स्वस्त आणि बनावट दारूची बाटली होती. फॉक्स 26 ह्यूस्टनने वृत्त दिलं की ही घटना 23 मे रोजी घडली. यावेळी तीन अज्ञात चोर दारूच्या दुकानात घुसले आणि सर्वत्र दारूच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या.
चोरट्यांची नजर 4,200 डॉलरच्या (3 लाख रुपयांच्या) दारूच्या बाटलीवर गेली. त्यांनी याबाबत चौकशी केली असता दुकानातील एका कर्मचाऱ्याने येऊन डिस्प्ले कॅबिनेटचं कुलूप उघडलं. कर्मचाऱ्याने कॅबिनेट उघडताच त्यातील एकाने बाटली हिसकावून घेतली, तर दुसऱ्या व्यक्तीने दारूचा दुसरा बॉक्स उचलला आणि ते बाहेर निघून गेले. मात्र, बाहेर पडण्यापूर्वीच वाईन बॉक्स खाली पडला (Men Steal Expensive Liquor Bottle).
मिळालेल्या माहितीनुसार दारूच्या दुकानदाराने सांगितलं की यातील एका व्यक्तीलाच दारूची बाटली घेऊन जाता आलं आणि ही वाइनची बाटलीही बनावट होती. ज्याची किंमत तब्बल 4,200 डॉलरपेक्षा खूप कमी होती. या घटनेतील तिघेजण अद्याप फरार आहेत, त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदत मागितली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संशयितांपैकी एकाने पांढरा स्वेटर, काळ्या रंगाचे शॉर्ट्स, पांढरी टोपी आणि पांढरे बूट घातले होते. दुसऱ्याने काळ्या रंगाचा स्वेटर, गडद शॉर्ट्स आणि निळे बूट घातले होते, तर तिसऱ्याने काळे जॅकेट आणि निळी जीन्स घातली होती. या तिघांच्या अटकेसाठी मदत करणाऱ्याला पोलीस 5,000 डॉलरपर्यंतचं बक्षीस देणार आहेत.
0 Comments