एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. यानंतर संबंधित महिला गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात (Abortion) करण्यात आला आणि या महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शामराव पाटील (वय 29, रा. जोगेश्वरी पूर्व मुंबई) असे महिलेची फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर महिलेवर अत्याचार करण्यात आलेल्या महिलेचे वय 30 आहे.
अनेकदा शारीरिक संबंध ठेवले
या महिलेनं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, समीर पाटील याने 18 मे 2018 पासून ते जानेवारी 2022 या कालावधीत लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्याने पाचगणी, मनोरी मालाड, बावधन याठिकाणी त्याने या तरुणीवर अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली. मात्र, तिला यानंतर गर्भपात करायला सांगितला आणि तिचा गर्भपात करण्यात आला.
मात्र, तरीसुद्धा पीडितेने आरोपी समीर याला लग्नाबाबत वारंवार विचारले. मात्र,त्याने शिवीगाळ केली. तसेच महिलेला बघून घेतो, अशी धमकी दिली. यानंतर पीडितेला आपली फसवणूक झाली आहे, असे तिच्या लक्षात आले आणि तिन पोलीस ठाणे गाठले. पीडितेने मेघवाडी मुंबई पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. यानंतर हा गुन्हा पाचगणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महामुलकर करत आहेत.
0 Comments