-->

Ads

केवळ PUBG खेळण्यासाठी नाही, तर आरोपीनेच केला आईच्या हत्येचा धक्कादायक खुलासा

 

मुलाने आईच्या हत्येबाबत सांगितलेल्या गोष्टी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. 16 वर्षीय मुलाला आईच्या हत्येचा पश्चाताप नाही.






    लखनऊ, 11 जून : ज्या घटनेमुळे (Uttar Pradesh News) अख्ख्या देशाला धक्का बसला आहे, त्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. मुलाने आईच्या हत्येबाबत सांगितलेल्या गोष्टी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. 16 वर्षीय मुलाला आईच्या हत्येचा पश्चाताप नाही. गेल्या दोन दिवसांपासून अधिकारीमुलाचीचौकशी करीत आहे. यातून त्यांनी (Killed Mother) एक रिपोर्टही तयार केली आहे.

    त्यानुसार केवळ पबजी खेळामुळे त्याने आईची हत्या केली नसल्याचं समोर आलं आहे. वाचा त्यातील काही अंश...


    आईला का आणि कधी मारलं?

    उत्तर - आरोपी मुलाने पोलिसांना सांगितलं की, शनिवारी (4 जून 2022) रात्री तीन वाजता त्याने आईची हत्या केली. आईने शनिवारी रात्री आठ वाजता त्याच्यावर 10 हजार रुपये चोरी करण्याचा आरोप केला होता. काही वेळानंतर पैसे सापडले होते. मात्र आई त्यालाच चोर समजत होती. यानंतर कपाटातून त्याने पिस्तूल काढली. त्यात नेहमी एक गोळी लोड केलेली असते.

    मित्राला दुर्गंध आला नाही ? 

    सऱ्या दिवशी घरी आलेल्या मित्राने विचारलं की, खोलीतून दुर्गंधी येत आहे. घरासमोरील जमा झालेलं पाण्यातून दुर्गंधी येत आहे. यानंतर त्याने रूम फ्रेशनरने स्प्रे केला. मध्ये मध्ये तो दुसऱ्या खोलीत जाऊन बहिणीला धमकी देत होता. मित्र असेपर्यंत त्याच्या खोलीत येऊ नये.

    हत्येनंतर काय केलं?

    रविवारी संपूर्ण दिवस तो घरातच होता. सायंकाळी मित्रासोबत क्रिकेट खेळायला गेला होता. बाहेर जाताना बहिणीला शेजारच्या काकूंपाशी सोडलं. त्यांना सांगितलं आई बाहेर गेलीये. रात्री परतला तर मित्रासोबत लॅपटॉपवर सिनेमा पाहिला. आरोपीने पुढे सांगितलं की, आई रागाच्या भरात मारून टाकेन असं म्हणायची. म्हणून मीच तिला मारल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं.

    कोणता गेम खेळत होता?

    सुरुवातील आरोपी शांत होता. नंतर म्हणाला की, पबजी गेमचा नवीन बॅटल ग्राऊंड गेम होता. हा गेम खेळत होता. यामुळे अभ्यास होत नव्हता. शाळेतून तक्रारी येत असल्याने आई मोबाइल रिचार्ज करीत नव्हती. शाळेतून वारंवार तक्रार येत असल्याचं त्याच्या वडिलांनीही पोलिसांना सांगितलं होतं.

    सध्या मुलावर बाल सुधार गृहात कौन्सिलिंग होत आहे. आईची हत्या केल्यानंतर त्याने ज्या मित्राला मृतदेह ठिकाण्यावर लावण्यासाठी मदत मागितली होती, त्याची शुक्रवारी चौकशी झाली. मित्राने कबुल केलं की, आरोपीने पाच हजार रुपयांच आमिष दाखवलं होतं. नकार दिल्यानंतर त्याने धमकी दिली होती.

    Post a Comment

    0 Comments