Sidhu Moose Wala Murder Case CCTV Footage: हत्येत वापरण्यात आलेल्या अल्टो कारचे नवीन सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) समोर आले आहे.
सिद्धू मुसेवाला हत्याकांडात वापरण्यात आलेल्या अल्टो कारचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अनेक खुलासे होण्याची अपेक्षा आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मुसेवालाच्या हत्येनंतरच्या 9 तासांचे आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की, मानसापासून सुमारे 100 किमी अंतरावर एक अल्टो कार मोगाच्या पेट्रोल पंपावर सुमारे 3 वाजून 15 मिनिट 29 सेकंदांनी उभी आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये शूटर पेट्रोल भरताना दिसत आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर जी कार उभी आहे तीच कार आहे ज्यातून गोळीबार करणारे पळून गेले होते. कारच्या पुढच्या सीटवर दोन लोक बसलेले दिसतात. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला शूटर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला हाताच्या इशाऱ्याने बोलवतो आणि पेट्रोल भरण्यासाठी पैसे देतो. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कारमध्ये 1500 रुपये किमतीचे पेट्रोल भरले होते.
शूटर कार राष्ट्रीय महामार्गावर सोडून फरार झाले होते
पेट्रोल पंपाचा कर्मचारी पैसे देऊन अल्टोमध्ये पेट्रोल भरतो, त्यानंतर शूटर गाडी घेऊन निघून जातात. गोळीबार करणारे सुमारे 2 मिनिटे पेट्रोल पंपावर थांबले मात्र पोलिसांना त्याची माहितीही नव्हती. पेट्रोल भरल्यानंतर शूटर्स पुढे जातात आणि यू-टर्न घेतात आणि नंतर हायवेवर निघून जातात. नंतर हे सर्व आरोपी कार धरमकोट राष्ट्रीय महामार्गावर सोडून पळून गेले. मुसेवाला यांच्या हत्येनंतर पोलिसांनी महामार्गावरून कार जप्त केली.
0 Comments