महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दहावीचा एकूण निकाल 96.94 इतके टक्के लागला आहे.
10th Result 2022 स्पेशल निकालाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल हा अखेर जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दहावीचा एकूण निकाल 96.94 टक्के लागला आहे.\
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 94.40% लागला आहे.
एकूण 66 विषयांना सुधारित मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये 26 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे.
राज्यातील शाळांतून 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी शाळांचा निकाल 100 % लागला आहे.
सन 2022 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2021 च्या निकालाच्या तुलनेत कमी आहे.
खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 54,303 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 79.06% आहे.
कुठे बघता येईल निकाल
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 2022 News18.com वर पाहता येईल. तुम्ही MSBSHSE च्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. 10वीचे निकाल 2022 - lokmat.news18.com वर लाइव्ह 10वी 2022 बोर्ड रिझल्ट ऑनलाइन बघू शकता.
16,38,964 विद्यार्थ्यांचं भविष्य आज ठरणार
यंदा महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी संपूर्ण 16,38,964 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 8,89,505 विद्यार्थ्यांची संख्या आहे तर 7,49,458 इतकी विद्यार्थिनींची संख्या आहे.
0 Comments