ही घटना उत्तर प्रदेशातील कोल्हुई पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे पीडित पतीने सांगितलं की, गावात राहणाऱ्या एका नातेवाईकांच्या माध्यमातून दीड महिन्यांपूर्वी लग्न करवून देण्यात आलं होतं. तरुणी शेजारच्या जिल्ह्यातच राहते. पत्नीलालग्नाच्या
दुसऱ्या दिवसापासून त्रास होत होता. तिला पोटदुखीचा त्रास होत होता. एकेदिवशी अचानक तिला उटल्या होऊ लागल्या. ज्यानंतर गुरुवारी प्रकृती अधिक ढासळल्याने तिला जिल्ह्या रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
अल्ट्रासाउंड रिपोर्ट समोर आल्यानंतर नवविवाहिता गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर सासरच्या मंडळींनी मुलीच्या नातेवाईकांकडे याबाबत जाब विचारला. मुलीच्या नातेवाईकांनी हा रिपोर्ट चुकीचा असल्याचं सांगितलं. त्यांनी पुन्हा अल्ट्रासाऊंड केलं, यात तरुणी गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.
0 Comments