एकीकडे तळकोकणात पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईतही पावसाची (Mumbai Rain) जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे.
मुंबई, 10 जून : एकीकडे तळकोकणात पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईतही पावसाची (Mumbai Rain) जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. गेल्या काही वेळापासून मुंबईत जोरदार पाऊस बसरत आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या गारव्यामुळे दिलासा मिळाला आहे. पावसाचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. तळकोकणात मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान मुंबई अजूनही मान्सूनपूर्वी सरी कोसळत आहे. आज पुणे, नाशिक, धुळे, चंद्रपूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व सरींना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
यंदा राज्यासह देशभरात उष्णतेच्या झळा मार्च महिन्यापासून जाणवू लागल्या. (Maharashtra Heat Wave) महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात तापमानाचा पारा 45 अंशावर पोहोचला आहे. या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 105 ते 110 टक्क्यांदरम्यान असतो)
• सामान्य पावसाची शक्यता 65 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 96 ते 104 टक्क्यांदरम्यान असतो)
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 25 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 90 ते 95 टक्क्यांदरम्यान असतो)
• दुष्काळाची शक्यता 0 टक्के (मोसमी पाऊस LPA च्या 90 टक्क्यांपेक्षा कमी आहे)
2022 मध्ये कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल:
• 166.9 मिमी या सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये 107 टक्के पाऊस पडू शकतो
• सामान्य पावसाची शक्यता 70 टक्के.
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 10 टक्के
285.3 मिमी या सरासरीच्या तुलनेत जुलैमध्ये 100 टक्के पाऊस पडू शकतो
• सामान्य पावसाची शक्ययता 65 टक्के
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 15 टक्के
258.2 मिमी या सरासरीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 95 टक्के पाऊस पडू शकतो
• सामान्य पावसाची शक्यता 60 टक्के
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 30 टक्के
170.2 मिमी या सरासरीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 90 टक्के पाऊस पडू शकतो.
• सामान्य पावसाची शक्यता 20 टक्के
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के
• सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता 70 टक्के
0 Comments