राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या विशेष अधिवशेन घेण्याचा आदेश दिला आहे. या अधिवेशनात राज्य सरकारच्या (Maharashtra Government) बहुमताबाबत चाचपणी होणार आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी याबाबत राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. पण त्यांच्या पत्र आणि याबाबतच्या आदेशाविरोधात महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. महाविकास आघाडीकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मनमानी पद्धतीने अधिवेशन बोलवण्याचे आदेश जारी केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
"सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अर्जात शिवसेनेने असा युक्तिवाद केला आहे की, अधिवेशन बोलवण्याचा राज्यपालांचा आदेश मुख्यमंत्री आणि मंत्रीपरिषद यांच्या शिफारसी आणि सल्ल्याने जारी करण्यात येण्याची गरज आहे. मात्र येथे राज्यपालांनी त्याचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने अधिवेशन बोलविण्याचे आदेश जारी केले आहेत", असं शिवसेनेने याचिकेत म्हटलं आहेत.
0 Comments