-->

Ads

आई-वडिलांच्या प्रेमाची शिक्षा मुलीला; मृत्यूनंतरही सोडली नाही पाठ

  मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) दिंडोरी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला. आई-वडिलांच्या प्रेमाची शिक्षा त्यांच्या (Crime News) लेकीला मिळाली. या मुलीच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला. मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या जातीतील तरुणीसोबत लग्न केलं होतं.

मुलीच्या मृत्यूनंतर निराधार आई मुलीचा मृतदेह घरी घेऊन आली. तब्बल 24 तास मृतदेह घरात पडून होता. त्यांचे कोणतेच नातेवाईक माणुसकीच्या नात्यानेही त्यांच्या मदतीसाठी आले नाहीत. शेवटी समाज सेवकांनी मृतदेहाला खांदा देऊन मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचला. यानंतर मृत मुलीच्या छोट्या बहिणीने सर्व अंत्यसंस्कार केले.

मृत पूजा सोनीच्या वडिलांनी दुसऱ्या जातीतील महिलेसोबत लग्न केलं होतं. ही बाब त्यांच्या नातेवाईकांना आवडली नव्हती. तिच्या वडिलांना 11 भाऊ आहेत. वेळ सर्व ठीक करेल असा विचार करून ते भोपाळला काम करण्यासाठी निघून गेले. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी पूजाचं लग्न गेल्या वर्षी भोपाळमधील गांधीनगरमध्ये झालं होतं. लग्नाच्या एका वर्षात पूजाच्या सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढलं. यादरम्यान पूजाच्या वडिलांचा मृत्यू झाला.

यानंतर महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन डिंडोरीला आली. येथे आजारादरम्यान पुजाचा मृत्यू झाला. मृतदेह कसाबसा तिची आई घरी घेऊन आली. मात्र मुलीच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीच आलं नाही. वेगळ्या जातीत लग्न केल्याची शिक्षा मुलाला भोगावी लागली. शेवटी समाज कार्यकर्त्यांनी येऊन मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास मदत केली.

Post a Comment

0 Comments