-->

Ads

उल्हासनगर मध्ये छात्र प्रवेश उत्सव आणि महिला सशक्तीकरण कार्यक्रम संपन्न ,माँ काली चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्री स्कुल यांचा स्तुत्य उपक्रम


सुमारे दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्या असून आता लहान विद्यार्थी नव्या जोमाने शाळेत जायला लागले आहे, त्याच अनुषंगाने उल्हासनगर येथील माँ काली चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्री स्कुल तसेच नवोदित स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने छात्र प्रवेश उत्सव आणि महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यात लहान शालेय विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, वह्या पुस्तके, पाण्याची बाटली, सॉक्स, टाई अश्या विविध वस्तू वाटप करण्यात आले, त्याच प्रमाणे महिला बचत गटाच्या महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या, यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गायकवाड, उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी, रश्मीका फाउंडेशनचे अध्यक्ष राजन चंद्रवंशी, आगरी सेनेचे जितेंद्र जोशी, नवोदित शाळेचे मुख्याध्यापक हितेंद्र नेमाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments