मुसेवाला यांच्याशी जवळीक साधण्यासाठी त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता का?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मूसेवाला हे देखील काँग्रेसच्या तिकीटावर मानसा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते.
मानसा कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटवर बाहेर आलेला गँगस्टर मनमोहन सिंह मोहनाचं राजकीय कनेक्शन पूर्णपणे उघड झालं आहे. मनमोहन सिंह मोहना याला राजा वडिंग यांनी काँग्रेसमध्ये सहभागी करून घेतलं होतं. राजा वडिंग हे सध्या पंजाब काँग्रेसचे पक्षप्रमुख आहेत.
मनमोहन सिंह मोहना पंजाबमधील कुख्यात गुंड जग्गू भगवानपुरियासाठी काम करतो. मनमोहन याला 30 मार्च 2022 रोजी पटियाला येथून अटक करण्यात आली होती. 30 मार्च रोजी मनमोहनला एक पिस्तूल, 45 काडतुसे आणि फॉर्च्युनर कारसह पकडण्यात आलं होतं.
गायक मूसेवाला यांची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात 29 मे रोजी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पंजाब पोलीस विभागाने सिद्धू मुसेवालासह ४२४ लोकांची सुरक्षा हटवल्यानंतर एक दिवसानंतर ही घटना घडली. यापूर्वी पंजाब पोलिसांनी सांगितलं होतं की मूसेवालाच्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग होता.
0 Comments