-->

Ads

आता बोला! मोबाईल नेटवर्कची चोरट्यांनी केली चोरी, ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश

  

अनेकवेळा आपल्या मोबाइलचा नेटवर्क (Thieves steal mobile network) गेल्याचा घटना समोर येतात. त्याला कारणीभूत काही तांत्रिक अडचणी असतात. मात्र आता मोबाईलचा नेटवर्क जाण्याचं एक नवीन कारण समोर आलं आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांनी (thane kapurbawdi police station) मोबाईल टॉवरचे (mobile tower) कार्ड चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मोबाईल टॉवरमध्ये ए.बी.आए.ए कार्ड हे नेटवर्क जोडण्याचे काम करत असते. हे कार्ड चोरल्याने आपोआपच मोबाईलचे नेटवर्क गायब होते. या कार्डमध्ये प्लॅटिनम हा महागडा धातू असतो. हा धातू काढून बाकीचे सामान चोरटे भंगारात विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

या प्रकारात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 7 लाख 20 हजार किंमतीचे इलेक्ट्रॉनिक सर्किट असलेले 14 ए.बी.आय.ए कार्ड तसेच इलेक्ट्रॉनिक सर्किट असलेले मोबाईल टॉवर लिंक कनेक्टिविटी करीता वापरण्यात येणारे बेसबॅण्ड युनिट एकूण 8 नग असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत.

दरम्यान,  बीडमध्ये यात्रा उत्सवात गर्दीचा फायदा घेवून महिलांच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या चोरीला जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. या टोळीत चार महिलांचा समावेश असून त्यांना अटक केली आहे. बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे वैकुंठवासी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 22 व्या पुण्यतिथीचा समारोप प्रसंगी महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन महिला आणि लहान मुलांच्या दागिन्यावर डल्ला मारला.

छोट्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचा बदाम एका महिलेने चोरला असताना काही महिलांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर नेकनुर पोलीस व आर.सी.पी च्या महिला कर्मचाऱ्यांनी तीची विश्वासात घेऊन विचारपुस करत एकूण चार महिलांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये माधुरी डुकुळे (वय-२४) संगिता सकुळे (वय-४० यादोघींसह अन्य दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments