मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एम्सच्या अहवालातून समोर आलं की मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुमारे 50 वर्षांच्या एका व्यक्तीला दक्षिण दिल्लीतून एम्समध्ये मृतावस्थेत आणण्यात आलं होतं (Man Dies after Choking on a Momo). एका दुकानात जेवण करत असताना अचानक तो जमिनीवर पडला, असं पोलीस तपासात उघड झालं. पोस्टमॉर्टम दरम्यान सीटी स्कॅनच्या तपासणीत असं दिसून आलं की त्याच्या वरच्या श्वासनलिकेच्या किंवा विंडपाइपच्या सुरुवातीला काहीतरी वस्तू अडकली आहे. यावरुन डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की त्याचा मृत्यू मोमोज खाल्ल्यानंतर गुदमरल्याने झाला आहे.
हा अहवाल जर्नल ऑफ फॉरेन्सिक इमेजिंगच्या ताज्या आवृत्तीत प्रकाशित करण्यात आला आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी मिंटला सांगितलं की, “हे निष्कर्ष वैद्यकीय दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, परंतु ते केवळ सीटी स्कॅनद्वारेच केले जाऊ शकतात. पारंपारिक व्हिज्युअल पोस्टमॉर्टम तपासणीत ते शोधले जाऊ शकत नाही."
वैद्यकीय भाषेत, गुदमरणे ही अशी स्थिती आहे जिथे घशाची पोकळी (पोटात अन्न जाण्यासाठीची नलिका) आणि श्वासनलिका यांच्यामध्ये कोणत्याही जागी वायुमार्गात अडथळा निर्माण होतो. जेव्हा एखादी व्यक्ती अन्ननलिकेमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मोठी असलेली कोणतीही गोष्ट खाते आणि चुकून ती श्वासनलिकेत सरकते तेव्हा ते पोस्टरियर हायपोफॅरिंक्समध्ये (नलिकेचा खालचा भाग जो अन्ननलिका आणि श्वासनलिकेकडे जातो) राहू शकतं. त्यामुळे श्वसनमार्गात अडथळा येतो आणि त्यामुळं गुदमरल्यासारखं होतं.
अहवालाचे लेखक आणि एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ अभिषेक यादव म्हणाले, “वाफवळेळे मोमो हे दिल्लीतील आवडत्या स्ट्रीट फूडपैकी एक आहेत. मोमोजचा पृष्ठभाग निसरडा मऊ असतो, जो नीट चावल्याशिवाय गिळल्यास प्राणघातक ठरू शकतो. या प्रकरणात, मृत्यूचं कारण न्यूरोजेनिक कार्डियाक अरेस्ट होतं, जे मोमोज खाल्ल्यानंतर गुदमरण्यामुळे झालं होतं.
यादव पुढे म्हणाले, “मोमोजचा आकार 5×3 सेमी असतो, जो खूप मोठा आहे आणि अशा प्रकारचं अन्न खाताना लोकांनी जागरूक असलं पाहिजे. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा उपस्थितांनी ताबडतोब Heimlich Maneuver करणे आवश्यक आहे - एक प्राथमिक उपचार प्रक्रिया ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या श्वासनलिकेतील अडथळे दूर करण्यासाठी नाभी आणि बरगड्यांच्या दरम्यान ओटीपोटावर अचानक तीक्ष्ण दाब लागू केला जातो. हे तोपर्यंत केलं जातं, जोपर्यंत हे अन्न तोंडावाटे बाहेर पडत नाही.
0 Comments