-->

Ads

बाल्कनीत रोमान्स करणं कपलला भलतंच महागात पडलं; व्हिडिओ समोर येताच महिलेला अटक

 Kai Tak एमटीआर स्टेशनजवळील एका 36 वर्षीय महिलेला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिचा गुन्हा असा होता की तिने बाल्कनीत जोडीदारासोबत रोमान्स केला.



नवी दिल्ली 12 जून : एक कपल आपल्या बाल्कनीमध्येच रोमँटिक झालं. या नादात त्यांनी हद्द इतकी पार केली की त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेला अटक केलं आहे (Woman Arrested after Romance in Balcony). तर पुरुष अद्याप फरार आहे.

हे प्रकरण हाँगकाँगमधील आहे. येथील काई-तकच्या जुन्या विमानतळाजवळील एका उंच इमारतीच्या बाल्कनीत रोमान्स करणारं हे जोडपे अडचणीत सापडलं आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, Kai Tak एमटीआर स्टेशनजवळील एका 36 वर्षीय महिलेला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिचा गुन्हा असा होता की तिने बाल्कनीत जोडीदारासोबत रोमान्स केला.

या महिलेला हाँगकाँगच्या कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. त्यानुसार व्हिडिओमध्ये दिसणारी कृती सार्वजनिक शालीनतेला बाधा आणणारी आहे. या आरोपात या महिलेला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. बॅरिस्टर अल्बर्ट लूक वाई-हंग यांनी या प्रकरणी सांगितलं की, अशा प्रकरणात क्राइम ऑर्डनन्स ऑफेन्स ऑफ इंडीसेन्सी इन पब्लिकचा आरोप लावला जातो. या अंतर्गत 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.

खरंतर हे जोडपं त्यांच्याच घरात होतं, पण बाल्कनी हा मोकळा भाग आहे. अशा स्थितीत बाल्कनी ही खासगी जागा असली तरी उघड्यावर रोमान्स करताना दिसणं कायद्याचं उल्लंघन असल्याची माहिती वकील लुक यांनी दिली. यासोबतच त्यांनी माहिती दिली की, केवळ जोडपंच नाही तर हा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करणाऱ्या व्यक्तीही कायद्याच्या कक्षेत येऊ शकतात. त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. पोस्ट करणाऱ्याला ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments