प्रकरण जनपदच्या बैरिया येथील आहे, ज्यात वराच्या बाजूने अचानक हुंड्याची मागणी (Dowry in Wedding) झाल्याने विवाह सोहळ्याचं वादात रूपांतर झालं. याचा परिणाम म्हणजे ज्या नवरीला आपल्या सासरी जायचं होतं, ती मंडपातून थेट पोलीस ठाण्यात पोहोचली.
हे प्रकरण कसया पोलीस ठाण्याच्या बैरिया भागातील आहे. जिथे बरवा जंगलातून वरात बलजीत सिंगच्या घरी आली होती. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. मात्र वरमाळेनंतर लग्नाचे दुसरे विधी सुरू होताच मुलाच्या बाजूचे लोक हुंड्याच्या मागणीवर उतरले. याआधीही वीस लाख रुपये हुंडा म्हणून दिले होते, मात्र नंतर आणखी दहा लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
या प्रकरणी नवरदेवाच्या पक्षासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. त्याचबरोबर पोलीसही याप्रकरणी काहीही बोलायला तयार नाहीत. मात्र, याप्रकरणी दोन्ही बाजूंमध्ये तोडगा निघणार असल्याचं पोलीस अधिकारी ऑफ कॅमेरा बोलत आहेत. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
0 Comments