-->

Ads

Bhiwandi Crime: पतीकडून पत्नीला बेदम मारहाण, बेशुद्धावस्थेत असलेल्या पत्नीला दारुड्याने जिवंत जाळलं, भिवंडीतील धक्कादायक घटना

 

Bhiwandi Crime News: दारुड्या पतीने आपल्या पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना भिवंडीतून समोर आली आहे.




    भिवंडी, 9 जून : भिवंडी शहरातील (Bhiwandi city) चाविंद्रा परिसरात दारुड्या पतीने कुटुंबिक वादातून पत्नीस बेदम मारहाण (wife beaten by husband) केली. या मारहाणीत पत्नी बेशुद्ध पडली असता जळणासाठी साठविलेल्या लाकूड फाट्यात टाकून जिवंत जाळल्याची (Wife burnt alive by liquor addicted husband) धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली आहे. कविता चौरसिया (वय 35 वर्षे) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून हत्या करणारा पती संतोष चौरसिया (वय 35 वर्षे) यास भिवंडी तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, त्याची बहीण कविता आणि तिचा पती संतोष हे दोघे त्यांच्या दोन मुलांसह चाविंद्रा येथील महाकाली ढाबा येथील चाळीत राहत होते. मोलमजुरी करणारा संतोष चौरसिया हा व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याने काही काम करीत नसल्याने त्याचे पत्नी कविता सोबत नेहमीच भांडण होत होते. मंगळवार 7 जून रोजी सुध्दा संतोष घरी दारू पिऊन आला असता पत्नी कविता सोबत कौटुंबिक वादातून भांडण सुरू केले.


    वाद विकोपाला गेल्याने संतोषने पत्नीस लाकडी दांड्याने मारहाण करीत तिचे डोके लोखंडी कपाटावर आदळले. यामध्ये कविता बेशुद्ध पडली. त्यानंतर पती संतोष याने घराबाहेर पडवीत पावसाळ्यात जळणासाठी साठवून ठेवलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्या जवळ तिला फरफटत आणून लाकडांसह बेशुद्ध पत्नीस जाळून तिची हत्या केली.

    याबाबत भिवंडी तालुका पोलिसांनी माहिती मिळताच पोलीस पथकाने अवघ्या काही तासात या हत्ये नंतर फरार झालेला पती संतोष चौरसिया याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी मयत कविताचा भाऊ भारत रोज याने दिलेल्या फिर्यादी वरून पती संतोष चौरसिया याला हत्येसह पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.


    घरगुती भांडणं विकोपाला गेली, की त्यातून अनर्थ घडतात. आजवर अशी अनेक उदाहरणं घडली आहेत, मात्र जे झालं, ते कबूल करण्याऐवजी पळ काढण्याकडे काही जणांचा कल असतो. पुण्यातील ताथवडे इथेही सोमवारी (6 जून 22) असंच नाट्य घडलं. घरगुती वादातून पतीने आपल्या पतीचा खून केला आणि त्याने आत्महत्या केला असल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर बुधवारी (8 जून 22) त्यातील सत्य समोर आलं.

    Post a Comment

    0 Comments