30 मे च्या रोजी जवळपास 30 ते 35 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे घेऊन ते निघाले होते. दरम्यान रायपूर, राजनगाव, बालाघाट आणि गोंदिया येथील सराफांना दागिने देऊन गोंदियावरून ते भंडारा येथे जाण्यासाठी सायंकाळी बसमध्ये बसले. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बस साकोली बसस्थानकावर आली आणि त्यावेळी ही घटना घडली.
तहान लागल्याने बॅग बसमध्येच ठेवून पाण्याची बाटली घेण्यासाठी दिवानजी खाली उतरला. बसमध्ये आल्यानंतर पाहतो तर सीटवरील बॅग गायब झाली होती. घाबरलेल्या स्थितीत खाली उतरुन त्याने तत्काळ आपल्या मालकाला फोन करुन घडलेली हकीकत सांगितली. लागलीच साकोली ठाणे गाठले असता याप्रकरणी पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून उशिरा रात्री गुन्हा नोंदविला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या टीम रवाना करण्यात आल्या आहे. दिवाणजीला पोलिसांनी तक्रारीनंतर साकोलीत थांबवून घेतले. त्याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.
0 Comments