मिळालेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी या जोडप्याचं लग्न झालं होतं. तो 17 जून रोजी पत्नीसह सासरी पोहोचला. एका दिवसानंतर पत्नीला घेऊन घरी आला. रात्रीझोपायला जात असताना त्याने पत्नीला कोणासोबत तरी फोनवर बोलताना पाहिलं. याबाबत विचारलं तर बहिणीसोबत बोलत असल्याचं सांगितलं.
मध्यरात्री जेव्हा नवरदेवा जाग आली तर पत्नी अंथरुणावर नव्हती. तिची शोधाशोध सुरू केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. ती प्रियकरासोबत फरार झाल्याचं समोर आल्यानंतर नवरदेवाला धक्काच बसला. यानंतर पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
0 Comments