सुरेश गगनदीपसोबत राहू लागला. मात्र लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांतच गगनदीप घरातून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 75000 रुपये रोख घेऊन फरार झाली.
हे प्रकरण सीकर जिल्ह्यातील दादिया पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. ही नवरी लग्नाच्या 12 दिवसानंतरच पतीच्या घरातून 16 तोळे सोनं आणि 75000 रुपये रोख घेऊन पळून गेली. ही महिला आधीच तीन मुलांची आई असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलीस तिची अधिक चौकशी करत आहेत.
दादियाचे एसएचओ विजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, पिपराली भागातील सुरेश कुमार शर्मा यांनी या संदर्भात २९ मे रोजी तक्रार नोंदवली होती. या अहवालावरून पोलिसांनी नववधू गगनदीपला अटक केली. ती श्रीगंगानगर येथील रहिवासी आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, सुरेशने 15 मे रोजी दलालामार्फत गगनदीपशी लग्न केलं होतं. त्याबदल्यात दलालांनी खात्यात ५३ हजार रुपये जमा करून घेतले आणि नंतर 23 हजार रुपये रोख घेतले.
त्यानंतर सुरेश गगनदीपसोबत राहू लागला. मात्र लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांतच गगनदीप घरातून 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 75000 रुपये रोख घेऊन फरार झाली. सुरेशच्या अहवालावरून पोलिसांनी एक पथक तयार करून तिचा शोध सुरू केला. दरम्यान, गगनदीप श्रीगंगानगरला जाणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली.
त्यावर पोलिसांनी श्रीगंगानगरच्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून वधूचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला. या फोटोच्या माध्यमातून पोलिसांनी गगनदीनला श्रीगंगानगर येथून पकडलं. त्यानंतर तिला दादिया येथे आणून चौकशी करण्यात आली. चौकशीत समोर आलं की गगनदीप विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. पोलीस गगनदीपची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. गगनदीपच्या माध्यमातून दलालांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. चौकशीदरम्यान आणखी काही घटना उघड होण्याची शक्यता आहे.
0 Comments