घटनेची माहिती मालकिणीला मिळताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित माहिती मिळताच नराधम बाप फरार झाला आहे. नेरुळ पोलीस त्याचा शोध घेत असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
बिहारमधील (Bihar News) समस्तीपुरमध्ये जनसाधारण एक्सप्रेसमधून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीने (22) छेडछाडीला त्रस्त होऊन चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यावर विद्यार्थिनीने सांगितलं की, दुपारी 3.15 वाजता बरौली जाण्यासाठी ती जनसाधारण ट्रेनमध्ये चढली होती. जिथं ती बसली होती, तिथं 6 मुलगे होते. ते घाणेरडे कमेंट करीत होते. त्यांना नकार दिला तरी ते घाणेरडा स्पर्श करीत होते. ती त्यांना खूप वैतागली होती. तिची याचा खूप त्रास होत होता. ती गेटच्या जवळ आली.
मदतीसाठी तिने घरी फोन केला. त्यावेळी ती मुलं फोन खेचू लागले आणि तिला घाणेरडा स्पर्श करू लागले. ट्रेनमध्ये खूप लोक होते. मात्र कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. काय करावं तिला कळत नव्हतं. म्हणून स्वत:ची इज्जत वाचवण्यासाठी तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली.
0 Comments