-->

Ads

Navi Mumbai Pavane MIDC Fire : नवी मुंबईत पावणे MIDC मध्ये आग, आठ कंपन्यांमध्ये धग, भीषण अग्नितांडव

 


नवी मुंबईत पावणे MIDC मध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. ही आग इतकी भयानक आहे की तिने आजूबाजूच्या तब्बल आठ कंपन्यांना स्वत:मध्ये सामावून घेत प्रचंड मोठा भडका उडविला आहे. एमआयडीसीमधील तब्बल आठ कंपन्यांपर्यंत ही आग पसरली आहे. संबंधित परिसरात प्रचंड धुराचे लोळ पसरले आहेत. आग सातत्याने वाढताना दिसत आहे. आगीचा भडका पाहता ही आग लगेच थांबेल याची शाश्वती नाही. पण या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी सध्या दाखल झाल्या आहेत. तसेच आणखी काही गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. आग प्रचंड मोठी आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये ही आग आहे त्यामध्ये केमिकलचे ड्रम्स मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय काही कामगारही कंपनीत अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. आग लागल्यापासून 70 मीटर अंतरापर्यंत आगीचा छळा लागत आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं बचाव पथकावर मोठं आव्हान आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आठ कंपन्यांमध्ये ही आग पसरलेली आहे. कंपन्यांमध्ये केमिकलचे ड्रम्स आहेत. त्यामुळे हे ड्रम्स फुटून आगीचा मोठा भडका उडत आहे. या भयानक परिस्थितीला सध्याच्या घडीला नियंत्रणात आणणं अशक्य आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान सध्या बाहेरुन आपली सर्व यंत्रणा पणाला लावून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाचे जवान आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आग लागलेल्या एका कंपनीतील काही केमिकल ड्रम्स मोठ्या धाडसाने बाहेर काढले आहेत. पण अग्निशन दलाकडून केल्या जाणाऱ्या पाण्याच्या माऱ्याचा काहीच फायदा होताना दिसत नाहीय. पण ही आग आणखी इतर कंपन्यांमध्ये पसरु नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न देखील सुरु आहेत.

या आगीत अडकलेल्या आतापर्यंत चार जणांना रेस्क्यू ऑपरेशन करुन बाहेर काढण्यात आलं आहे. आणखी काही कामगार अडकले आहेत का याची चौकशी सुरु आहे. कंपन्यांमध्ये केमिकलचे ड्रम्स फुटत असल्याने वारंवार स्फोट होत आहे. विशेष म्हणजे सर्व कंपन्या अतिशय जवळजवळ आहेत. या कंपन्यांमध्ये एक ते दीड फुटाचं देखील अंतर नाही. त्यामुळे स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका बाजूच्या दुसऱ्या कंपनीपर्यंत पोहोचण्याची भीती आहे. आगीत कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे प्रचंड मोठे धुराचे लोट आकाशात जाताना दिसत आहेत. हे लोट अनेक किलोमीटर लांबून दिसत आहेत. धुराच्या लोटमुळे परिसरातील वातावरणात अंधार संचारलेला आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवणयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

Post a Comment

0 Comments