-->

Ads

IPL 2022 : धोनीच्या कॅप्टनसीमध्ये चेन्नई घेणार हैदराबादचा बदला! पाहा कशी असेल Playing 11

 

महेंद्रसिंह धोनीच्या नव्या परीक्षेचा पहिला पेपर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरूद्ध होणार आहे. या दोन्ही टीममध्ये आज (रविवार) पुण्यात लढत होत आहे.


मुंबई, 1 मे : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच मोठा बदल करत महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) पुन्हा एकदा कर्णधारपदी नियुक्त केलं आहे. सीएसकेनं या स्पर्धेत आठपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. आता 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना यापुढील प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नव्या परीक्षेचा पहिला पेपर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरूद्ध होणार आहे. या दोन्ही टीममध्ये आज (रविवार) पुण्यात लढत होत आहे.

महेंद्रसिंह धोनीसाठी ही लढत सोपी नाही. सनरायझर्स हैदराबादनं यापूर्वीच्या लढतीमध्ये सीएसकेचा 8 विकेट्सनं मोठा पराभव केला होता. या विजयानंतर हैदराबादची विजयी मालिका सुरू झाली. त्यांनी त्यानंतर सलग पाच सामने त्यांनी जिंकले. राशिद खानने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादचा यापूर्वीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरूद्ध शेवटच्या बॉलवर पराभव झाला होता.


हैदराबादचे बॉलर्स चांगलेच फॉर्मात आहेत. तसंच अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या तरूण जोडीनंही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यानंतरही धोनी कॅप्टन झाल्यानं सीएसकेची कामगिरी उंचावेल आणि त्यांना या सिझनमधील तिसरा विजय मिळेल अशी फॅन्सची अपेक्षा आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाच्या खेळाकडंही सर्वांचं लक्ष असेल. जडेजाला या सिझनमध्ये फार कमाल करता आलेली नाही. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठीच त्यानं कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य Playing 11 : केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर,  शशांक सिंह, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी. नटराजन



Post a Comment

0 Comments