-->

Ads

लग्नात आलेलं Gift उघडताच Blast, नवविवाहित तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार


 एक धक्कादायक बातमी (Shocking News) समोर आलीय. लग्नात आलेल्या गिफ्टचा स्फोट (Wedding Gift Exploded) झाल्यानं एक नवविवाहित (Newlywed) तरुण गंभीर जखमी झाला आहे. गुजरातमधील नवसारी (Navsari District of Gujarat) जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मंगळवारी ही घटना घडल्याचं समजतंय.

एक नवविवाहित पुरुष आणि त्याचा पुतण्या लग्नात भेटवस्तू दिलेल्या खेळण्यांचे रिचार्ज करताना स्फोट झाला. ज्या स्फोटात दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नवविवाहित तरुणाच्या वहिनीनं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

मिंधबारी गावातील स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, लतेश गावित यांचे एक-दोन दिवसांपूर्वी दक्षिण गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वांसदा तालुक्यातील गंगापूर गावातील एका मुलीसोबत लग्न झालं. या जोडप्याला त्यांच्या लग्नात नातेवाईक आणि मित्रांनी भेटवस्तू दिल्या होत्या.

मंगळवारी सकाळी गावित त्यांचा पुतण्या जियानसह त्यांच्या निवासस्थानी कुटुंबातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत भेटवस्तू अनपॅक करत होते. भेटवस्तूंच्या एका पॅकेटमध्ये त्यांना एक रिचार्ज करण्यायोग्य खेळणं सापडलं. तेव्हा गावित आणि त्याच्या पुतण्याने खेळणी रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला अन् तेव्हा अचानक स्फोट झाला. या स्फोटात दोघेही जखमी झाले आणि कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला.

गावित यांच्या हाताला, डोक्याला आणि डोळ्यांना जखमा झाल्या आहेत, तसेच उजव्या हाताच्या मनगटाचाही भाग कापला गेल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं. 3 वर्षीय जियानच्या डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. दोघांनाही तातडीने नवसारीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हे खेळणी कोयंबा येथील रहिवासी राजू पटेल यांनी भेट दिल्याचे गावित कुटुंबीयांना वधूच्या पालकांकडून समजलं. त्याचे वधूच्या मोठ्या बहिणीशी प्रेमसंबंध होते आणि ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानेच हे घडवून आणल्याचा संशय आहे.

गावित यांच्या कुटुंबीयांनी वांसदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments