20 वर्षांची मुलगी आफरीन हिचे लग्न तिच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलासोबत निश्चित झाले होते. तर तेच दुसरीकडे आफरीनचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही गोष्ट घरातील सर्व सदस्यांना माहित होती.
नेमकं काय घडलं
प्रियकरासोबत बोलत असल्याने एका मुलीसोबत तिच्या बापाने धक्कादायक प्रकार केला आहे. ही 20 वर्षीय मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. त्यामुळे तिच्या बापाने तिची हत्या (Daurghter Murder by Father) केली आहे. बिहार राज्यातील दरभंगा (Darbhanga) जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह (Dead body) हा नदीत फेकून देण्यात आला होता. मात्र, मुलीच्या हत्येचा ऑडिओ व्हायरल (Audio Clip Viral) झाल्याने तिच्या बापानेच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. यानंतर मृताची आई, बहीण आणि मामा यांनी ही ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून पोलिसांना दिली आहे. उस्मान असे आरोपी पित्याचे नाव आहे.
प्रियकराशी बोलायला केली मनाई
ही घटना बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील मोरो पोलीस ठाणे क्षेत्रातील रतनपुरा गावातील आहे. 20 वर्षांची मुलगी आफरीन हिचे लग्न तिच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुलासोबत निश्चित झाले होते. तर तेच दुसरीकडे आफरीनचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही गोष्ट घरातील सर्व सदस्यांना माहित होती. आफरीनला आपल्या प्रियकरासोबत बोलण्यास वडिलांनी मनाई केली होती. मात्र, असे असतानाही आफरीन तिच्या प्रियकराशी लपूनछपून बोलायची. असेच एक दिवशी ती तिच्या प्रियकराशी मोबाईलवर बोलत होती. यावेळी तिचा पिता आला आणि प्रियकराशी बोलताना पाहून संतापला. यानंतर त्याने रागाच्या भरात आफरीनला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिची हत्या करुन टाकली. 15 मे ही घटना घडली. यानंतर हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह हा नदीत फेकून देण्यात आला होता. तसेच ती हरवली आहे, असे गावात सांगितले. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला.
0 Comments