-->

Ads

महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस ; चांगल्या पिकांचा अंदाज


- पंजाबराव पाटील डख

- 7 ते 13 पर्यंत आभाळी वातावरणाचा अंदाज

- फुलसावंगी येथे कन्हैया कृषी केंद्राचे स्थानांतर कार्यक्रमात हजेरी



महागाव प्रतिनिधी:-  संजय जाधव


- शेतकऱ्यांना केले मोलाचे मार्गदर्शन

महाराष्ट्रत या वर्षी समाधान कारक पावसाचा अंदाज असून या वर्षी चागल्या पिकांचा अंदाज असल्याचा हवामान तज्ञ पंजाबराव पाटील डख यांनी व्यक्त केले ते फुलसावंगी येथे फुलसावंगी परिसरातील शेतकऱ्यांची हक्काचे  कन्हैया कृषी केंद्रांच्या उद्घाटन स्थानांतर कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

संपूर्ण महाराष्ट्रात हवामानाचे अचूक अंदाज सांगून जगाच्या पोशिंदा चे मोठे आर्थिक नुकसान थांबविनारे पंजाबराव डख यांनी आज फुलसावंगी येथे स्थलांतर वास्तू च्या उद्घाटनाला हजेरी लावली यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सर्व दूर समाधान कारक पाऊस होऊन सर्वच खरीप पिके जोरदार होणार असल्याचा महत्वाचा अंदाज व्यक्त केला.शिवाय पाऊस पडण्याचे वेगवेगळ्या पाउल खुणा कश्या ओळखाव्यात याचे कान मंत्र त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिल्या. निसर्ग हा शेतकऱ्यांचा मित्र असून त्यात होणाऱ्या बदलाच्या खुणा तो आपल्याला देत असतो ते केवळ आपल्याला ओळखून घेता आले पाहिजे निर्सगा सोबत आपण जितका संवाद साधू ते आपल्याला त्यातील तितके गुपिते तो उजागर करेल ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ होणारा नुकसानच नाही तर उत्पादन सुद्धा वाढवता येईल असे व्यक्तव्य करून शेतकऱ्यांना निसर्गाशी समरस होण्याचे आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना यावेळी केले.

वास्तु उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना चे हित पाहता फुलसावंगी येथे पहिलीच वेळ एखाद्या आयोजकांनी शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जि प सदस्य डॉ बी एन चव्हाण हे होते.तर यावेळी फुलसावंगी येथील पत्रकार संघातर्फे हवामान तज्ञ पंजाबराव ढक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विजय महाजन, रवी पांडे,बाबू खान पठाण, सरपंच शीतल ताई भिसे , अरुण धकाते, गजानन प्रतापरवार, बाळू पेन्शनार,  सुधाकर जाधव ,  नरेंद्र शिंदे  ,यांच्या सह मोठयाने संख्येने शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments