-->

Ads

ईदीच्या दिवशी नमाज पठण करताना कारने चिरडलं, चिमुरडीसह पाच जखमी

 या घटनेनंतर तातडीने सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


पाटना, 3 मे : बिहारमधील (Bihar News) सुपौलमध्ये मंगळवारी एक मोठा (Road Accident) अपघात घडला. ईदीच्या दिवशी एका कारने अनेक लोकांना चिरडलं. ही घटना बीरपूर नगर भागात घडली. नमाज पठण करून लोक जसे उठले तेव्हाच एक कार मागून आली आणि अनेक लोकांना चिरडत पुढे निघून गेली. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यात आलं. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाने चुकून रिव्हर्स गिअर दिला आणि ज्यामुळे कार अचानक फास्ट झाली आणि मागे नमाज पठण करणाऱ्या लोकांना चिरडलं. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जेथे लोक नमाज पठण करीत होते, त्याच्या शेजारी एक कार उभी होती. लोक नमाज पठण करून उठले तोच अचानक ड्रायव्हरने रिव्हर्स गिअर घेतला. कोणाला काही कळायच्या आत एका मुलीसह पाच जणांना चिरडून कार निघून गेली. या घटनेची सूचना मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हा प्रकार चुकून घडला की जाणून-बुजून केला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Post a Comment

0 Comments