"गुफ़्तगू करते रहा कीजिये यहीं इंसानी फितरत है,
सुना है बंद मकानों में अक्सर जाले लग जाते है..."
करोना काळ आता मागे सारल्या सारखा आहे. मधले वर्षे सारेच केवळ आभासी माध्यमातून संपर्कात होते. आता प्रत्यक्ष भेटून संवाद साधता येतो आहे. सारेच प्रत्यक्ष भेटी-गाठी, आदानप्रदान आणि संवाद करण्यासाठी आतुर आहेत. म्हणूनच, 'कल्याण काव्य मंच' आणि 'स्वराज्य रणरागिणी महिला संस्था' यांनी संयुक्त विद्यमाने, खुली काव्य मैफल "काव्यांजली"चे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. २५ मे २०२२ रोजी, सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ही खुली काव्य मैफल सर्वांसाठी खुली असून, प्रथमेश मंगल कार्यालय, गणपती मंदिर रोड, साईबाबा मंदिराजवळ, टिटवाळा (पूर्व) ४२१ ६०५) येथे काव्य मैफल रंगणार आहे.
दै. सामानाचे वरीष्ठ उपसंपादक श्री माधव डोळे ह्या काव्य मैफलीचे अध्यक्षपद भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठाचे सहाय्यक निबंधक, प्रा. अमेय सुनील महाजन उपस्थित राहणार आहेत. ६०हुन अधिक कवीनी खुल्या मैफलीत सहभाग नोंदविला असून मैफल चांगलीच रंगणार आहे.
कल्याण-डोंबिवली, टिटवाळा परिसरातील कवी आणि काव्यरसिकांनी ह्या मैफलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन
कल्याण काव्य मंच परिवार आणि स्वराज्य रणरागिणी महिला संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments