-->

Ads

दारुड्या पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नी माहेरी गेली, सासुरवाडीत घडला धक्कादायक प्रकार

  पती-पत्नीमधील भांडणं (Husband Wife Dispute) काही नवीन नाहीत. पती-पत्नी भांडणात नंतर गोड होतात. अनेक पती-पत्नींमध्ये वाद हे होतच असतात. मात्र, काही वेळा या वादाचे रुपांतर अनपेक्षित असेही होते. पती-पत्नीमधील वाद किंवा भांडण विकोपाला जाऊन अनर्थ घडल्याच्या बातम्याही (Husband Wife Dispute News) तुम्ही वाचल्या असतील. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पती-पत्नीचा वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की, यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे

पती विनाकारण मारहाण करायचा. या कारणामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. यानंतर पत्नी घरी पुन्हा परत यावी, यासाठी पती तिला घ्यायला तिच्या माहेरी गेला होता. मात्र, यावेळी एक अनपेक्षित घटना घडली. पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या या पतीने आपल्या सासूसाच खून केला. (Murder of Mother in Law) त्याने आपल्या पत्नीवर आणि सासूवर विळ्याने हल्ला केला. (Attack on Murder in Law and Wife)  यात सासूबाई कमळाबाई सोमा भुतांबरे (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पतीने केलेल्या या हल्लात पत्नी इंदुबाई किसन पारधी आणि त्यांची 12 वर्षाची मुलगी माधुरी ही जखमी झाली आहे.

Post a Comment

0 Comments