आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आर्थर रोड कारागृहात अनैसर्गिक लैंगिक संबंध (Unnatural Sex) ठेवल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इरशाद इस्लाम शेख असे आरोपीचे नाव आहे. तो गोवंडी येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे आर्थर रोड कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मधील बॅरेक क्रमांक 7 मध्ये ही घटना घडली. आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांची तक्रार पोलिसांना मिळाली होती. यामध्ये पोलिसांना कारागृहात लैंगिक शोषणाच्या कथित घटनेची चौकशी करण्यास सांगितले होते. पीडित मुलगी हरी ओशिवरा येथील रहिवाशी आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांनी तुरुंगाचा दौरा केला. त्यावेळी पीडितेचा जबाब नोंदवला. ती मागील काही दिवसांपासून तुरुंगात आहे.
0 Comments